India Vs South Africa 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील तीन डाव अवघ्या चार सत्रात संपले. भारताने पहिल्या डावात ९८ धावांची आघाडी घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसरा डाव १७६ धावांत गुंडाळला.
भारताने आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांत संपवला. त्यानंतर भारताने पहिल्या डावात १५३ धावा केल्या. पहिल्याच दिवशी विक्रमी २३ विकेट पडल्या. यासोबतच १३७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. क्रिकेटच्या इतिहासात ६०० चेंडूंच्या आत तीन डाव संपण्याची ही पहिलीच वेळ आहे.
*अशाच बातम्य साठी what's app ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या चॅनेल फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
३ जानेवारी २०२४ ला टीम इंडिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसऱ्या टेस्ट सामना रंगणार आहे. पहिल्या टेस्ट सामन्यात झालेल्या दारूण पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया तयार झालेली आहे. मात्र दुसऱ्या टेस्ट सामन्या पूर्वी टीमला मोठा धक्का बसलेला आहे. दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी टीमचा कर्णधार अचानक बदलण्यात आलेला असून या सामन्यात दुसऱ्या खेळाडू वर टीमची धुरा सोपवण्यात आलेली आहे.
हा खेळाडू करणार टीमचं नेतृत्व
ईएसपीएन ने दिलेल्या बातमी नुसार, टेम्बा बावुमा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे भारता विरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मधून बाहेर पडला आहे. बॉक्सिंग डेच्या सामन्यात ही तो मैदाना बाहेर दिसला होता. टेम्बा बावुमा च्या अनुपस्थितीत सेंच्युरियन मध्ये १८५ रन्सची मॅचविनिंग इनिंग खेळणाऱ्या डीन एल्गरकडे कारकिर्दीतील शेवटच्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेची कमान सोपवण्यात आलीये. बावुमाच्या जागी झुबेर हमजाचा टीम मध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
पहिल्या सामन्यात टेम्बाला झाली होती दुखापत
टीम इंडिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टेस्ट सामना सेंच्युरियनमध्ये खेळवण्यात आला होता. या टेस्ट सामन्याच्या 20व्या ओव्हरमध्ये बावुमाला दुखापत झाली. यावेळी लाँग-ऑफच्या दिशेने बॉलचा पाठलाग केला आणि बाऊंड्रीपूर्वी बॉल थांबवताना तो जखमी झाला. याचवेळी त्याला दुखापत झाली आणि तेव्हाच तो मैदानातून निघून गेला. यावेळी त्याला स्कॅनसाठी पाठवण्यात आलं.
दक्षिण आफ्रिकेचे मुख्य कोत शुकरी कोनराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'टेम्बाची स्थिती फारशी चांगली नाही. तो फलंदाजी साठी तयार होता आणि आम्ही त्याच्या तब्येतीचं निरीक्षण करतोय. आम्हाला वाटलं की, जर त्याला मैदानावर फलंदाजी साठी पाठवलं तर त्याची दुखापत आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. या सामन्यात जर आम्ही लवकर विकेट गमावलेल्या असत्या तर त्याने फलंदाजी केली असती. १५० रन्सने पुढे असल्याने फलंदाजी ला पाठवलं नाही.
दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियामध्ये बदल
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ ते ७ जानेवारी २०२४ दरम्यान केपटाऊन मध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टेस्टसाठी मोहम्मद शमीच्या जागी आवेश खानची निवड केलेली आहे. आवेश खान दक्षिण आफ्रिके विरोधातील वनडे सिरीजचा भाग होता. तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने ६ विकेट्स मिळवल्या होत्या. आवेशने ३८ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये १४९ विकेट्स मिळवले आहे.
कशी असेल दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा कर्णधार, शुभमन गिल, यशस्वी जैयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल विकेटकीपर, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह उप-कर्णधार, प्रसिद्ध कृष्णा, केएस भरत विकेटकीपर, अभिमन्यु ईश्वरन, आवेश खान.
*अशाच बातम्य साठी what's app ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या चॅनेल फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*